हेमांगीला मिळाली महानायकासोबत स्क्रीन शेअर करायची संधी; आनंद व्यक्त करत म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होणे आणि बेधडक बोलणे या स्वभावामुळे हेमांगी कायम चर्चेत असते. कामाबद्दल बोलायचं झालं तर आजवर तिने अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेमांगीने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

हेमांगी कवी सोशल मीडियावर नेहमीच तिच्या आयुष्याबद्दल विविध अपडेट्स शेअर करताना दिसते. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी हेमांगीने शेअर केलेल्या पोस्टमधून तिने चाहत्यांसोबत स्वतःचा आनंद शेअर केला आहे. मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली आहे. याचा आनंद शेअर करताना हेमांगीने चालू शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. शिवाय या पोस्टमध्ये तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच एक फोटो शेअर केला आहे.

हेमांगीने शेअर केलेला अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो ससोहळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोसोबत तिने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओत हेमांगी अभिनीत अमिताभ बच्चन आणि आणखी एका सहकलाकारासोबत एका जाहीरातीत काम करताना दिसते आहे. याशिवाय तिने जाहीरातीचे काही BTS सुद्धा शेअर केले आहेत. सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘क्या कहॅूं की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए! जिथे शब्द संपतात! Happy Birthday श्री अमिताभ बच्चन सर. उद्या सविस्तर पोस्ट लिहीते. आधी मला स्वतःला स्वीकारायला वेळ द्या’.