हेमांगीने शेअर केले युवराज सिंगसोबतचे फोटो; नेटकरी म्हणाले, ‘गो मावशे.. हा म्हावरा कुठं गावला..?’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी ही मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हेमांगी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॉलोवर्सदेखील फार आहेत. शिवाय ती सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. कधी वेगवेगळे लूक, कॉमिक रिल्स तर कधी वेगवेगळ्या विषयांवर हेमांगी मोकळेपणाने व्यक्त होताना दिसते. आताही तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेमांगी कवीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा कोळी लूक दिसून येत आहे. यानंतर तिने आणखी एक फोटो पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये हेमांगीसोबत प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग दिसतोय. हेमांगीने युवीसोबतचे फोटो शेअर करत सगळ्यांनाच थक्क केले आहे. या फोटोशूटचे खास निमित्त असल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, अभिनेत्री हेमांगी कवी आणि क्रिकेटपटू युवराज सिंग एका जाहिरातीच्या शुटिंगमूळे एकत्र दिसले आहेत.

अभिनेत्री हेमांगीने सोशल मिडीया इंस्टाग्रामवर एक फोटो कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हेमांगीने युवराज सिंगसोबत खास फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. हेमांगी आणि युवराजने एका जाहीरातीत एकत्र काम केले आहे. अद्याप ही जाहीरात नेमकी कसली आहे..? याबाबत काही खुलासा झालेला नाही. या जाहिरातीसाठी हेमांगीने कोळी लूक केला होता. या फोटोंवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. ‘गो… मावशे… हा म्हावरा कुठ गावला..?’, ‘नशीबवान आहेस तू,त्याचे मुळे विश्वचषक जिंकलो आपन.. बादशाह माणूस’ अशा कमेंटचा यात समावेश आहे.