Hemangi Kavi | ‘फार फार तर एखादा भाग फसेल….’ झिम्मा 2 पाहिल्यावर हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत


Hemangi Kavi | सध्या झिम्मा 2 हा चित्रपट यशाचे एक एक शिखर गाठताना दिसत आहे आणि कलाकारांना तसेच प्रेक्षकांना देखील हा चित्रपट मोठ्या प्रमाणात आवडत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून या चित्रपटाचे कौतुक करत आहे. अशातच मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील झिम्मा 2 बद्दल एक पोस्ट केली आहे ती सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

हेमांगी कवी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आणि तिच्या चाहत्यांना नेहमीच नवनवीन अपडेट देत असते. अशातच तिने केलेल्या पोस्टमध्ये तिला झिम्मा 3 हा चित्रपट हवा असल्याची इच्छा तिने व्यक्त केलेली आहे.

हेही वाचा – ‘मी खरंच नि:शब्द झाले..’; बॉलिवूडच्या ड्रिमगर्लला भेटल्यानंतर रुपालीने व्यक्त केला आनंद

हेमांगी कवीने फेसबुकवर झिम्मा 2 चित्रपटातील काही फोटो पोस्ट करत म्हणाली आहे की, ‘मला तर बाई म्हणजे लय मजा आली. हेमंत ढोमे काय कमाल सिनेमा आहे. खरं सांगू का तर झिम्मा 1 पेक्षा झिम्मा 2 जास्त जमून आलाय. कदाचित या बायकांना आम्ही आधीपासून ओळखत होतो म्हणून हे आम्हाला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि रिलेटेबल.. विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीण न करता सहजपणे आपल्याला बदल करू शकणारी खरंच मजा आली प्रचंड एन्जॉय केला मी हा सिनेमा.”

तिने पुढे लिहिले, “निर्मिती सावंत करायचं या बाईचं म्हणजे मला काही सुचेचना… कसं कसं करतेस ग तू इतक्या वर्षापासून कसं काही अबाधित ठेवलेस… आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला मुख्य हीरोइन म्हणून बघितले जात नाही. पटकन चरित्र कलाकार सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच कॅटेगिरीज करतो. हॉलीवुड किंवा इतर कुठेही असं होत नाही मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना लीड म्हणूनच पाहिले जात. अवॉर्ड साठी मुख्य श्रेणी करतही गोष्ट तर आपल्याला इथे सुरू झाली, तर मी त्याला तू कारणीभूत असेल ताई… इतकं भारी काम केलेस.. सुहासताई हीच गोष्ट तू तिथे मी ज्यावेळी वाटली होती आणि आज ही तुमची इंदू पाहून वाटलं तो लाईन मारायचा असेल मी तर शिट्टीच हाणली थेटरमध्ये क्या बात है.”

रिंकू महादेव राजगुरू दुसरं कौतुक करावसं वाटतं ते रिंकू राजगुरुचे खूप समजून उमजून काम केले. टिपिकल सून न करता. एकदम छान तान्या साकारली आहेस. स्क्रीनवर दिसतात आपल्या चेहऱ्यावर स्माईल येत होतं. थोडक्यात यायचं कमाल आणलीये .एक एक सीन चोपलाय तिघींनी आता जाता जाता एवढे सगळे आता आम्हाला झिम्मा 3 हवाय हवाय म्हणजे हवाय ते तू बाकी सिनेमे करत राहा. झिम्मा यूनिवर्सलला अंत देऊ नकोस. फार फार तर काय होईल एखादा पार्ट फसेल ठीक आहे की, पण हा खेळ थांबू नकोस. एवढीच विनंती तुझ्या सगळ्या टीमकडे इरावती करणे क्षितिज पटवर्धन कमाल कमाल कमाल असे तिने त्या पोस्टमध्ये लिहिलेले आहे.”

हेमांगी कवीने लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. तसेच अनेक जण तिला दुजोरा देऊन आम्हाला देखील झिम्मा 3 हा चित्रपट हवाय असे सांगत आहे.