Hemangi Kavi |अभिनेत्री हेमांगी कवी ही मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. हेमांगी कवी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. हेमांगीने अनेक नाटक मालिका आणि चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.
नुकतेच हेमांगी निधीच्या स्टोरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. आणि यामध्ये तिने माणसांच्या सवयी बद्दल लिहिले आहे. म्हणजे काही माणसे चार्ट पाहतात आणि ते उत्तर द्यायला विसरतात असे तिने यात म्हटले आहे.
काय आहे हेमांगीची पोस्ट | Hemangi Kavi
ही स्टोरी पोस्ट करून तिनेही अत्यंत वाईट सवय असल्याचे सांगितले आहे .आणि त्याचप्रमाणे “मला माफ करा मी पण त्याच माणसांपैकी एक आहे,” असे देखील तिने म्हटले आहे.
अभिनेत्री तिच्या आयुष्यातील अनेक घटना अनेक प्रसंग तसेच तिचे विचार सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यावर अनेक चाहते त्यावर कमेंट करून तिच्या लिखाणाचे कौतुक देखील करत असतात. परंतु काहींना मात्र तिचे लिखाण पटत नसल्याने तिला ट्रोल देखील केली जाते.
हेही वाचा – अखेर सत्य उघड होणार!! प्रिया- अस्मिताचा खोटेपणा अर्जुनसमोर येणार; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल
अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील स्क्रीन शेअर केली आहे. एका जाहिरातीच्या निमित्ताने तिलाही संधी मिळाली होती. सध्या ‘ती मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत दिसत आहे. या मालिकेतील वकिलाची भूमिका स्वीकारत आहे तिचे पात्र देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.