हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल बुधवारी नितीन देसाई या बड्या नावाच्या कला दिग्दर्शकाने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याचे वृत्त समोर आले आणि संपूर्ण कलाविश्व हादरले. दरम्यान मराठी तसेच बॉलिवूड सिने क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी, कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी दुःख व्यक्त केले. अभिनेत्री हेमांगी कवीनेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोबतच त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
हेमांगीने हि पोस्ट शेअर करत लिहिलंय, ‘जेव्हा इतक्या मोठ्या नावाच्या माणसाचा अंत असा होतो तेव्हा मनात प्रश्नांचं काहूर माजतं. मन उत्तरं शोधू लागतं. ती मिळत नाहीतच. मग आपण जरतरच्या गोष्टी बोलू लागतो. काही बाही धंडाळू लागतो. काय ते कळत ही नाही! पोटात खड्डा पडला बातमी ऐकून! मनात, अंगात थरथर आहे. आत खोलवर धडधडतंय आताही हे लिहीताना! नितीन सर! तुम्ही आदर्श, उदाहरण होतात आमच्या सारख्या लोकांसाठी! स्वप्न मोठी कशी बघायची ती सत्यात कशी उतरवायची याचं! भव्यदिव्यतेचं प्रतिक होतात! ‘होतात’ हा शब्द लिहावा लागतोय आज! छे! २०१६ मध्ये माझा दादा Fortis hospital मध्ये admit होता! समोरच्या Bed वर तुम्ही होतात. तेव्हा मी तुम्हांला पहील्यांदा भेटले होते. माझा दादाचं नाव नितीन, वडलांचं नाव चंद्रकांत. हे जेव्हा मी तुम्हांला सांगितलं तेव्हा म्हणाला होतात “अरे, म्हणजे देसाई आणि कवी चाच काय तो फरक! बघा हं, दोघांची औषधं, उपचार इकडे तिकडे व्हायची.” हे ऐकून Dr आणि Nurses सकट आम्ही हसलो होतो. आज पटकन तेच आठवलं!’
‘प्रत्येक माणूस जाणारच आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीए पण जेव्हा इतका यशस्वी, हिंदी सिनेमा, मालिका वरर्तूळात नाव कमवलेला, ते नाव टिकवून ठेवलेला मराठी माणूस आपलं आयुष्य असं संपवतो तेव्हा आमच्या सारख्या छोट्या लोकांचा confidence हलतो! Blank व्हायलं होतं! असा निर्णय घेताना तुमचं काय झालं असेल याचा किंचितसा अंदाज ही कुणी लावू शकणार नाही. पण आता जिथे कुठे असाल तिथे शांत असाल. या materialistic जगाच्या सगळ्या गराड्यातून दूर, मुक्त!’