‘व्यवहारी जगातल्या नवीन वर्षाच्या…’; हेमांगी कवीची New Year पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज तारीख १ जानेवारी २०२४. आजपासून एक नवं वर्ष सुरु झालं आहे आणि या नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेकांनी अनेक संकल्प केले असतील. गेल्या वर्षाचा निरोप घेत अनेक आठवणींची उजळणी करत आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नववर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

गेल्या २०२३ वर्षाला आनंदाने निरोप देऊन २०२४ चे उत्साहात स्वागत करताना मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. न्यू इयरच्या शुभेच्छा देताना तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘Happy New Year!! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!! नये साल की ढेर सारी शुभ कामनाएं! त.टी. : आज आपलं मराठी नववर्ष नाही वगैरे lecture please नको. चैत्र महीन्यातलं मराठी नववर्ष आम्ही खुप दणक्यात, आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरं करतो. पण तुर्तास व्यवहारी जगातल्या नविन वर्षाच्या तुम्हांला अनेकानेक शुभेच्छा!!!’

हेमांगीची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून तिच्या या पोस्टवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. यातील अनेकांनी, ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!’ अशा कमेंट करत हेमांगीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री हेमांगी कवी अशीच सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. अनेकदा तिच्या परखड मतांमुळे ती चर्चेचा विषय बनताना दिसते. आता या नव्या वर्षात हेमांगी कोणकोणत्या कारणांमुळे चर्चेत येणार हे तर येणाऱ्या दिवसांतचं कळेल.