एखादी साडी पटकन निवडेन पण..!! दिवाळीनिमित्त हेमांगी कवीची खास पोस्ट; करतेय ‘हे कठीण काम


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीचा सण हा अत्यंत खास असतो. कारण दिवाळीत सर्वत्र लख्ख प्रकाश आणि उत्साह असतो. या सणात सगळे मित्र मैत्रीण, नातेवाईक एकमेकांच्या घरी जातात, भेटवस्तू देतात, एकत्र फराळ करतात. त्यामुळे दिवाळी इतर सणांइतकीच फार महत्वाची आणि खास असते. प्रत्येकजण आपापल्या परीने हा सण साजरा करतो. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. कुणी मिठाई वाटतात, तर कुणी गोडधोडाचा फराळ करतात, तर कुठे दिव्यांची रोषणाई आणि कंदिलाचा झगमगाट दिसतो. दरम्यान मराठी अभिनेत्री हेमांगी कवीच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी असते. जिच्याविषयी सांगताना तिने खास पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवीने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘दरवर्षी प्रमाणे यंदाही! मला आठवतंय दुकानात, बाजारात जाऊन ‘कंदील’ निवडायची जबाबदारी मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा पासून देण्यात आली किंवा मी ती स्वतः घेतली कारण रंगांचं ज्ञान इतरांपेक्षा टीचभर जरा बरं म्हणून. पण मग तेव्हापासून ही रीतच झाली दरवर्षी वेळात वेळ काढून मी कंदील खरेदी करायला जाते म्हणजे जातेच. खूप भारी वाटतं निरनिरळ्या पद्धतीचे कंदील पाहून! प्रत्येकाला वाटतं सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके कंदील आपल्या दारात, खिडकीत आसावा! खरंतर कंदील इकडून तिकडून सारखेच पण आपण निवडलेला कंदील हा आपल्या पुरता का होईना special च असतो!

‘पण मग इतक्या सर्व options मधून तो ‘एक’ कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या! लय कटीन! म्हणजे मी एखादी साडी पटकन निवडेन पण कंदील निवडणं is altogether different game भाई. कारण ही गोष्ट अशीय ना की ती घरातल्या प्रत्येकाला आवडायला हवी, आपली मनमानी करून चालत नाही! मला वाटलं म्हणून मी आणला असं करून नाही चालत. तर घरातल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा विचार करून आणावा लागतो! निदान मी तरी असं करते! मज्जा असते सगळी! तुम्ही करता का असं?” हेमांगीची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या पोस्टवर नेटकरी दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्यासह आठवणी शेअर करत आहेत.