Hemangi Kavi | अभिनेत्री हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन विश्वातील एक आघाडीची आणि चर्चेची अभिनेत्री आहे. आजपर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून काम करून तिची अभिनय शैली लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. हेमांगी ही तिच्या अभिनयामुळे जेवढी चर्चेत असते. तेवढीच ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून देखील चर्चेत असते. अनेकवेळा ती तिचे मत हे सोशल मीडियावर मांडताना दिसते.
तिथे मांडलेले मत अनेकांना आवडते तर अनेकांना आवडत नाही. परंतु नुकतेच हेमांगीला सोशल मीडियावर एका नेटकार्याचा संताप आलेला आहे आणि तो अनुभव तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला आहे.
हेमांगीनी एक फोटो पोस्ट केला होता त्या फोटोवर एका व्यक्तीने एक विचित्र कमेंट केली. त्यामुळे हेमांगी कविचा संताप झाला आहे. यावेळी हेमांगी लिहिते की, “बायोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा, इंडियन आर्मी…. आणि प्रत्यक्षात वागताना असली माणसं आतून जनावरच असतात. माणसाची कातडे घालून समाजात हिंडत असतात. हे कुठल्याही चित्रपट नाटकापेक्षा जास्त घातक आहे चित्रपट काल्पनिक असतो. पण अशी जनावर आपल्या आजूबाजूला आहेत खरीखुरी वार करतात आणि पकडले ही जात नाहीत माझ्यासाठी हा विचित्र प्रकार आहे.”
त्याचप्रमाणे हेमांगिनीने इंस्टाग्रामवर स्क्रीन शॉट टाकला देखील आहे त्यानंतर त्याने कमेंट डिलीट केली. हे लक्षात येतात हेमांगी लिहिते, “माणसाचे बायो बघा आपल्या आपल्या जनावराचा काय करायचं??? मी हे स्टोरीमध्ये पोस्ट केल्यावर यांनी ही कमेंट डिलीट केली. म्हणून ही स्टोरी तुम्हाला दिसत नाहीये. चला आपण आपल्या बायोमध्ये त्याचा उल्लेख केलाय त्याची आठवण आली असावी चांगल आहे.” या विषयानंतर हेमांगी कवी चांगली चर्चेत आलेली आहे.
हेही वाचा – मयुरी वाघने पूर्ण केलं नव्या घराचं स्वप्न; सोशल मीडियावर शेअर केले वास्तुशांतीचे फोटो