‘प्रिय पाऊस…’; हेमांगी कवीने घेतला रिमझिम श्रावण धारांच्या मनमोहक स्पर्शाचा आनंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि मराठी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमांगी कवी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिच्या विविध पोस्ट व्हायरल होत असतात. अनेकदा ती विविध विषयांवर अगदी बिनधास्त आणि बेधडकपणे व्यक्त होत असतात. कित्येक विषयांना शब्दांच्या माध्यमातून तिने वाचा फोडली आहे. दरम्यान आता तिची एक मान्सून पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे आणि अत्यंत सुंदर अशी ही व्हिडीओ आहे. या व्हिडिओमागे एक सुंदर बीजी म्युझिक वाजत आहे आणि हेमांगी पावसाच्या प्रत्येक थेंबाचा स्पर्श अनुभवते आहे. प्रत्येक थेंबाचा स्पर्श हेमांगीला आनंद देतोय हे तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ अत्यंत मनमोहक आणि आनंददायी आहे.

हेमांगीच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलेय कि, ‘वाह क्या बात है… तू नेहमीच खूप सुंदर दिसतेस… त्या थेंबांचं काय भारी नशीब आहे जे तुला स्पर्श करू शकतात’. तर आणखी एका नेटकाऱ्याने म्हटले आहे कि, ‘अंधारातुन उजेडाकडे….’. याशिवाय अनेकांनी हेमांगीच्या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. हेमांगीचा हा मनमोहक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.