हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा केवळ सण नसून हि एक भावना आहे. गणेशोत्सवात आनंदाची, हर्षाची, उत्साहाची एक लहर उठते. ज्यामध्ये सगळे भाविक न्हाहून जातात. सर्वसामान्यांसोबतच हा सण सेलिब्रिटी मंडळीही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. काहींनी बाप्पाची मुर्ती घरीच बनवली तर काहींनी खास आठवणी शेअर केल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील तिच्या बालपणाची एक खास आठवण चाहत्यांसोबत शेयर केली आहे.
हेमांगी कवीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर गणरायाचा एक फोटो शेयर केला आहे. यासोबत तिने एक लांबलचक कॅप्शन देखील दिलं आहे. हेमांगीने लिहिलंय, ‘श्रीगणेशचतुर्थीच्या सर्वांना खूप शुभेच्छा!! मी दुसरीत असताना एका चित्रकला स्पर्धेत काढलेलं “गम्पती बाप्पा”चं चित्लं! यासाठी मला बक्षीस मिळालं होतं. आयुष्यातलं पहीलं बक्षीस! परीक्षकांनी या चित्राला बक्षीस देण्याचं कारण ही आवर्जून सांगितलं. ते म्हणाले चित्र म्हणून हे तेवढं छान नसलं तरी चित्रकलेला लागणारी निरीक्षण शक्ती अफाट आहे. एखाद्याने नुसतंच गणपतीचं चित्र काढलं असतं पण हीने भटजी बुवा (त्याचं detailing- जानवं, उपरणं, धोतर, शेंडी, मागे तंबोरा घेऊन बसलेली मुलगी (ती माझी ताई आहे कारण ताई गाण्याच्या class जायची आणि गणपतीत ती तिच्या सरांना साथ द्यायची), तबला वाजवणारा मुलगा (ताईच्या class मधला), उंदीरमामा, अगरबत्ती, नेवैद्य, मोदक या सर्व गोष्टींसाठी बक्षीस देतोय’.
‘तेव्हाच्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी शाळेत प्रत्येक वर्गात जाऊन मिळालेलं बक्षीस दाखवताना काय shining वाटली होती काय सांगू! त्यांच्या या कौतुकामुळे मला प्रोत्साहन मिळालं. तेव्हाच मी चित्रकार व्हायचं ठरवून टाकलं आणि झालेही! गणपती म्हणजे कलेची देवता. पुढे याच कलेच्या देवतेने मला अभिनय क्षेत्रात आणलं आणि माझ्या अभिनय क्षेत्रातला श्रीगणेशा झाला!’ या पोस्टबरोबरच तिने तिला ट्रोल करणाऱ्यांनादेखील आधीच टोमणा मारला आहे. यात ती म्हणते की, ‘हीला एवढं लहानपणीचं कसं काय आठवतं बरं असं जर मंडाळातील काही सदस्यांना वाटलं तर हो गणपतीचा वरदहस्त माझ्यावर आहे आणि हत्ती या प्रजाती सारखीच माझी ही memory strong आहे! म्हणून नाटकातले संवाद आम्हांला पाठ होतात!’ हेमांगीची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.