लय खुळ्यागत प्रेम!! लग्नाच्या वाढदिवशी हेमंतची भन्नाट पोस्ट; म्हणाला, ‘येड्या पाटलाला शहाणी पाटलीण..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटामुळे दिग्दर्शक- अभिनेता हेमंत ढोमे आणि त्याची पत्नी अभिनेत्री क्षिती जोग ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मराठी सिनेविश्वातील हि लाडकी जोडी त्यांच्या नवनवीन कलाकृतींमुळे कायम चर्चेत येत असते. क्षिती जोग निर्मित- अभिनित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हे या जोडीच्या यशस्वी कारकिर्दीचे आणखी एक उदाहरण आहे. पण आज हि जोडी कलाकृतींमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आज क्षिती आणि हेमंतच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत.

अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी २०१२ साली एकेमकांसोबत लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या सुखी संसाराला तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि यानिमित्त हेमंतने आपल्या लाडक्या बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लग्नाच्या सुंदर प्रसंगातील काही खास क्षणचित्रे शेअर केली आहेत. सोबतच आपल्या बायकोसाठी म्हणजेच अभिनेत्री क्षिती जोगसाठी त्याने खास कॅप्शन लिहीत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक नेटकरी, चाहते आणि कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेता हेमंत ढोमेने हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. आपल्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, ‘११ वर्षांपुर्वी जगातली सगळ्यात भारी गोष्ट घडली!!! या येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली!!! तुला तर माहितीच आहे क्षिती आपलं लय खुळ्यागत प्रेम आहे… गाणं पण तेच आहे…(या गाण्यावर पटली राव!)’. हेमंत आणि क्षितीची भेट एका नाटकादरम्यान झाली. मग मैत्री आणि मैत्रीतून प्रेमात पडलेले हे दोन जीव एक झाले. दोघेही कायम एकमेकांवरील प्रेम वक्त करताना दिसतात. मराठी कलाविश्वात हि अत्यंत कुल जोडी म्हणून ओळखली जाते.