Hemant Dhome | ‘भारतातील सिस्टीम वाईट…’ हेमंत ढोमेने सांगितले परदेशात शूटिंग करण्यामागील कारण


Hemant Dhome | सध्या मराठीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट येत आहे. आणि या चित्रपटांची कथा पूर्णपणे वेगळी असल्यासारखे दिसते. चित्रपटाचे स्टारकास्ट तसेच लोकेशन या सगळ्या गोष्टी देखील प्रेक्षकांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत. मागील अनेक दिवसापासून काही मराठी चित्रपटांचा शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीचे एवढे चांगले दिवस कसे आले भारत सोडून ते लंडनमध्ये शूट कसे काय करतात आणि त्याचा नक्की फायदा काय होतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता याचे उत्तर दिग्दर्शक हेमंत होमे यांनी सगळ्यांना दिली आहे.

हेमंत ढोमे यांचा ‘झिम्मा 2’हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. झिम्मा आणि झिम्मा 2 या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग परदेशात झालेले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता या परदेशात जाऊन शूट करण्याचा नेमकं कारण काय यामागचं कारण हेमंत ढोमे यांनी सांगितले आहे.

हेमंत डोंबे यांनी सांगितलं की, “भारतात शूट करायचं म्हटलं तर आपली सिस्टीम खूपच वाईट असल्याचा दिसून येतात. येथे पोलिसांना पैसे द्यावे लागतात. मुंबईत शूट करा आणि साताऱ्यात जाऊन शूट करा. पैसे देणे आल्याशिवाय ग्रामपंचायत पैसे द्यावे लागतात. हजारो लोकेशन असतात त्यात कोणी म्हणतो माझं घर दिसतंय माझं दुकान दिसतंय मग त्याला पैसे द्या.”

पुढे तो म्हणाला की, “लंडनमध्ये मात्र सगळं खूप क्लिअर आहे. एकदा या जागेचे किंवा रस्त्याचं नाव लिहून दिलं की त्या जागेवर कुठेही शूट करा. काही कर कुणी काही म्हणणार नाही. परमिशन घेतानाच काय लागते ते सगळं मेन्शन करायचं. कुणीही येऊन तुमच्या कामात व्यत्य आणत नाही. नागरिक येऊन असंच प्रेमाने चौकशी करतात त्यांचं नाव विचारतात आणि जातात म्हणून मला इतर निर्मात्यांना तिकडे जाऊन शूट करणे सोप्प वाटतं.”

या आधी लंडनमध्ये तीन अडकून सिताराम, डेट भेट , व्हिक्टोरिया, बापमाणूस यांसारखे चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झालेले आहे. नुकताच झिम्मा 2 देखील प्रदेशात शूट झाला आहे. आणि प्रेक्षकांना देखील हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात आवडत आहे.