गो लेडी बॉस गो!! ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलर पाहून हेमंतने केलं बायकोच्या भूमिकेचं कौतुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलिडकेच बॉलिवूड सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत आहेत. सध्या या सिनेमाची सर्वत्र एकदम जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात मराठी अभिनेत्री क्षिती जोगदेखील अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसते आहे. ट्रेलरमध्ये तिची झलक पाहताच तिचा पती आणि मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत ढोमेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री क्षिती जोगने आपण ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात एका महत्वपूर्ण भूमिकेत असल्याचे सांगत सिनेमाचे पोस्टर अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केले होते. हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले होते. अगदी तेव्हापासूनच या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री कोणत्या भूमिकेत असेल..? तिच्या भूमिका अंदाज कसा असेल..? याबाबत तुफान चर्चा सुरु झाली होती. यानंतर आता जेव्हा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे तेव्हा मात्र तिचा अनोखा अंदाज पाहून सगळे थक्क झाले आहेत. आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा एक वेगळी भूमिका या सिनेमात क्षिती साकारताना दिसणार आहे.

‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच व्हायरल होत आहे. या ट्रेलरमध्ये दोन कुटुंबांची आणि एकमेकांवर प्रेम करणाऱ्या रॉकी आणि रानीच्या गोष्टीची एक झलक पहायला मिळतेय. या ट्रेलरवर प्रेक्षकांनी तर कौतुकाचा वर्षाव केलाच आहे. शिवाय क्षिती जोगचा पती हेमंत ढोमणे देखील या सिनेमाच्या ट्रेलरला पसंती दिली आहे.

हा ट्रेलर आणि यातील क्षितीच्या भूमिकेची झलक पाहून हेमंत भारावून गेला आहे. क्षितीच काम पाहून हेमंतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर हा ट्रेलर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘कडक ट्रेलर!! गो लेडी बॉस गो!!’ क्षितीचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा येत्या २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.