Highest Paid Actor | शाहरुख, अल्लू, प्रभास नाहीतर ‘हा’ आहे सर्वात महागडा अभिनेता, एका चित्रपटाचे घेतो 250 कोटी


Highest Paid Actor | आजकाल चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक अभिनेते आहे. जे त्यांच्या कामासाठी खूप जास्त रक्कम घेतात जर आपल्याला कोणी विचारले की, सर्वात जास्त महागडा अभिनेता कोण आहे? , तर आपल्या तोंडावर शाहरुख खान, सलमान खान अल्लू अर्जुनची नावे येतील. पण तुम्हाला अजूनही माहित नाहीये की, मराठी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये असा एक अभिनेता आहे जो या सगळ्या अभिनेत्यांपेक्षा खूप जास्त पैसे घेतो.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1000 कोटीची कमाई करणारा शाहरुख खान तसेच पुष्पामधून घराघरात पोहोचलेला अल्लू अर्जुन यांना मागे टाकत असा कोणता अभिनेता आहे जो या सगळ्यांपेक्षा जास्त मानधन घेतो. तर दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत हे सध्या सगळ्यात जास्त महागडे अभिनेते असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल बंद झालं का..? अभिनेत्रीने Video शेअर करत दूर केली खवय्यांची शंका

रजनीकांत आहेत महागडे अभिनेते | Highest Paid Actor

नुकतेच काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांचा जेलर हा ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगला चालला. यानंतर त्यांनी त्यांच्या मानधनात मोठी बदल केल्याचा समोर आले आहे. रजनीकांत लवकरच दोन मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. या प्रोजेक्टसाठी त्यांनी दीडशे कोटींपेक्षा जास्त रक्कम घेतल्याचे समोर आले आहे.

रजनीकांत यांचा थलैवर 171 हा चित्रपट येणार आहे. यासाठी त्यांनी 260 कोटी रुपये मानधन घेण्याचे समोर आले आहे. परंतु याबाबत अजून कुठेही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे रजनीकांत हे आशियातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेते म्हणून ओळखले जातील.

थलैवर 171 मध्ये दिसणार अमिताभ बच्चन

रजनीकांतच्या थलैवर 171 मध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्स करत आहे. याआधी रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जगभरात सहाशे पाच कोटींची कमाई केली आहे.