अखेर अधिपतीने सांगून टाकलं.. खऱ्या आयुष्यात ‘अशा’ आहेत मास्तरीण बाई; जाणून घ्या


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका चांगलीच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे- कुलकर्णी, हृषीकेश शेलार आणि अभिनेत्री कविता मेढेकर या मुख्य भूमिकेत आहेत. तिघांच्याही भूमिकांनी मालिकेच्या कथानकाला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. दरम्यान अलीकडेच अभिनेत्री शिवानी रांगोळेचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त हृषिकेशने तिच्या खऱ्या आयुष्यातील स्वभावाचे वर्णन केले आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळे हि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची खऱ्या आयुष्यातील सून अर्थात त्यांचा मुलगा आणि अभिनेता विराजास कुलकर्णी याची बायको आहे. शिवानीने आतापर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. पण सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत ती साकारत असलेली ‘अक्षरा’ ही मुख्य भूमिका तिला प्रसिद्धी झोतात आणते आहे. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची जोडी प्रेक्षकांची अतिशय लाडकी आहे. अधिपतीच्या भूमिकेत असणाऱ्या हृषीकेश शेलारने शिवानी खऱ्या आयुष्यात कशी आहे आणि तिच्या कामाबरोबरचा त्याचा अनुभव कसा आहे..? हे सांगताना हि पोस्ट शेअर केली आहे.

ज्यात अधिपतीने म्हणजेच ऋषिकेशने अक्षरा अर्थात शिवानीचा एक खास बिहाईंड द सीन फोटो शेअर केला आहे. हा त्यांचा सेल्फी फोटो आहे. जो शेअर करत त्याने लिहिलं कि, ‘हॅपी बर्थडे द वन अँड ओन्ली मास्तरीन बाई. खूप छान व्यक्ती आणि सहकलाकार… माणूस म्हणून अत्यंत नम्र आणि खरी… तू आहेस तशीच राहा. आपलं हे बॉण्डिंग असंच कायम राहू देत ही इच्छा… तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुझं पुढील वर्ष यशस्वी जावो’. अशा पद्धतीने हृषिकेशने अगदी मोजक्या शब्दात शिवानीच्या स्वभावाचे वर्णन केले आहे.