हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेने मालिका विश्वात नाव कमावल्यानंतर चित्रपट सृष्टीतही चांगला जम धरला आहे. ‘दुर्वा’या मालिकेतून हृता घराघरांत पोहचली आणि प्रेक्षकांची लाडकी ठरली. केवळ मालिका नव्हे तर चित्रपट नाटकातूनदेखील तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. शिवाय सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे या माध्यामातून ती आपल्या चाहत्यांसोबत संवाद सांधताना दिसते. दरम्यान नुकतीच हृताच्या शेअर केलेली पोस्ट प्रचंड चर्चेचा विषय ठरली.
अभिनेत्री हृता दुर्गुळेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे कि, ‘जे जे लोक माझं आयुष्य पाहतात आणि त्याबद्दल गॉसिप (चर्चा) करत असतात. त्यांनी अजिबात थांबू नका. कारण माझ्या आयुष्याचा दूसरा भागदेखील लवकरच तुमच्या भेटीला येत आहे’. आता हृताने हि पोस्ट नेमकी कुणासाठी आणि का शेअर केली आहे ते पक्कं सांगता येणार नाही. पण या पोस्टमधून तिने नक्कीच कुणावर अरी निशाणा साधला आहे. ती व्यक्ती कोण आहे याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
अनेकदा हृता दुर्गुळे सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करताना दिसते. अत्यंत परखडपणे ती आपले मत मांडून आपल्याला खटकणाऱ्या विषयांवर बोलताना दिसते. त्यामुळे अभिनयासोबतचं स्पष्टवक्तशीरपणासाठीदेखील हृता दुर्गुळे ओळखली जाते. सध्या तिची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हि पोस्ट नेमकी कुणासाठी असेल..? याबाबत विविध तर्क लावले जात आहेत.
हृता दुर्गुळेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिचा ‘कन्नी’ हा चित्रपट येतो आहे. या चित्रपटातून ती पुन्हा एकदा अभिनेता अजिंक्य राऊतसोबत काम करताना दिसणार आहे. या दोघांची ‘मन उडू उडू झालं’ हि मालिका लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे आता या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील आतुर झाले आहेत.