हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. विषयातील वैविध्य आणि संवेदनशील कथानक हे या मालिकांचे वैशिष्ट्य आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ हि मालिका सुरु होतेय. या मालिकेत अभिनेता किरण माने हे सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या भूमिकेविषयी व्यक्त होताना किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याची मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
किरण माने मालिकेचा प्रोमो आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘…आपल्या एखाद्या भुमिकेतनं, आपल्या चाहत्या प्रेक्षकांचं जगणं समृद्ध व्हावं, अशी माझी लै इच्छा होती. आता ती संधी देणारं कॅरॅक्टर मी घेऊन येतोय… सिंधूताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा ‘रियल लाईफ हिरो’… सिंधूताईंच्या आयुष्यातला ‘बाप’माणूस अभिमान साठे! ज्याकाळात मुलांच्याबरोबर बसून मुलीनं शिकणं म्हणजे कमीपणाचं मानलं जायचं… पाप मानलं जायचं… त्याकाळात ‘माझ्या पोरीत काहीतरी जगावेगळं आहे. तिनं शिकावं. मोठ्ठं व्हावं. तिच्या गुणांना वाव मिळाला तर ती खूप नांव कमावेल’, हे या जगावेगळ्या बापानं ओळखलं होतं!’
‘…संत तुकोबारायाच्या विचारांवर चालणार्या या गरीब, कष्टाळू माळकरी माणसाच्या मार्गात पहाडाएवढ्या अडचणी आल्या… संकटांचा वर्षाव झाला… पण हार मानली नाही त्यानं. “फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर… नामाचा गजर सोडू नये !” या भावनेनं विपरीत परिस्थितीशी झुंज देत राहिला. त्याच्या संघर्षाचंच पुढे जाऊन त्या मुलीनं सोनं केलं ! सिंधुताईंचं आयुष्यही लै लै लै भयाण संघर्षात गेलंय. आईलाही नकोशी असलेली ‘चिंधी’ ते अनाथांना हवीहवीशी माय ‘सिंधूताई’, हा प्रवास वाटतो तेवढा साधासोपा नाहीये. मालिकाविश्वात खूप वर्षांनी खरंखुरं, तरल, भावस्पर्शी, प्रेरणादायी आयुष्य येतंय… ‘कलर्स मराठी’वर, १५ ऑगस्टपासून, संध्याकाळी ७ वाजता ‘सिंधुताई माझी माई’… नक्की बघा… आपल्या मुलामुलींना तर आवर्जुन दाखवा…’. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यांनतर मालिकेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.