आता कोणाचा नंबर…? आदिनाथ कोठारेला म्हणायचंय तरी काय..? ‘ती’ Insta पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश कोठारे यांच्यासह त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारेदेखील सिनेविश्वाचा लाडका अभिनेता आहे. त्याने मराठीसह हिंदी कलाविश्वातदेखील स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाचे बाळकडू मिळालेला आदिनाथ लहानपणापासूनच सिनेविश्वात कार्यरत आहे. त्यामुळे आदिनाथचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. जो त्याला नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यास उत्सुक असतो. अशातच आदिनाथने शेअर केलेल्या पोस्टमुळे तो चर्चेत आला आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे हा सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. या माध्यमातून तो कायम काही ना काही पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आताही आदिनाथने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. लवकरच तो आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज देणार असल्याचे यात समजत आहे. ज्याचा खुलासा आपण १ डिसेंबरला म्हणजेच आज करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. ‘१ डिसेंबरला कळणार ५ जानेवारीची गंमत आणि ५ जानेवारीला कळणार आता कोणाचा नंबर… stay tuned!’, असे कॅप्शन लिहलेली त्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

याशिवाय आज त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलंय, ‘आता कोणाचा नंबर..? उद्याच कळेल नक्की काय हा विषय..? Any Guesses’ आता आदिनाथला नेमकं यातून काय सांगायचंय ह्याचा अंदाज लावणं जरा कठीणच आहे. त्यामुळे जोपर्यंत आदिनाथ स्वतः अधिकृतपणे काही जाहीर करत नाही तोपर्यंत या पोस्टचे गूढ उलघडणार नाही. तरी अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टबाबत तर्क लावले आहेत. नवा चित्रपट, नवी मालिका किंवा नव्या प्रोजेक्टसाठी प्रमोशनल स्टंट असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.