सिद्धार्थ- मितालीच्या घरी पाळणा हलणार..? ‘त्या’ फोटोवरील कॅप्शनमुळे चर्चांना उधाण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक ट्रेंडिंग जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर. या जोडीने अनेक चाहते आहेत. सिद्धार्थ आणि मिताली यांची लव्ह स्टोरी आणि त्यांची कमाल केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांना प्रेमात पाडत असते. सोशल मीडियावर दोघेही प्रचंड सक्रिय असतात आणि त्यामुळे एकमेकांसोबतचे विविध फोटो तसेच रोमँटिक व्हिडीओ ते आवर्जून शेअर करत प्रेम व्यक्त करतात. पण आता सिद्धार्थ आणि मितालीने आयुष्यातील अत्यंत गोड प्लॅनिंग केले असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच ससोहळ मीडियावर विविध फोटो शेअर करताना दिसते. तिचा ग्लॅमरस अंदाज हा सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधताना दिसतो. पण यावेळी मितालीच्या फोटोपेक्षा जास्त लक्ष तिच्या फोटोसोबत जोडलेल्या कॅप्शनने वेधले आहे. या फोटोत मिताली काळ्या रंगाच्या अत्यंत सुंदर वनपीसमध्ये दिसत आहे. सोबतच कर्ली हेअर आणि लाईट मेकअपसह तिने स्वतःचा लूक पूर्ण केला आहे. साहजिकच ती नेहमीप्रमाणे या लूकमध्येही कमालीची सुंदर दिसते आहे. पण या फोटोसोबत तिने ‘मॉमीज गेटिंग हॉट’ असे कॅप्शन दिल्याने तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

मितालीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘मॉमी’ असा उल्लेख केल्याने चाहत्यांमध्ये ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. लवकरच मिताली आणि सिद्धार्थ पालकत्वाच्या विश्वात पदार्पण करणार आहेत असे बोलले जात आहे. अद्याप याबाबत मिताली किंवा तिचा पती अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मितालीच्या कॅप्शनवरून नेटकऱ्यांचा अंदाज चुकीचा असेल असे नक्कीच बोलता येणार नाही. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत मितालीला ‘तू प्रेग्नेंट आहेस का..?’, ‘तु खरचं आई होणार आहेस का?’, ‘मम्मी म्हणजे तुला नेमकं म्हणायचयं काय?’ असे प्रश्न विचारताना दिसत आहेत. पण यावर कोणतीच प्रतिक्रिया न देत तिने चाहत्यांची उत्सुकता ताणून धरली आहे.