मराठी अभिनेत्रीचा स्विमिंग पूलमध्ये पानीवाला डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, ‘पावसाळ्यात वणवा..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘भाग्य दिले तू मला’मधून नकारात्मक पात्र साकारणारी मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करून ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत तिने ‘सानिया’ हे खलनायकी पात्र साकारले असले तरीही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर तिला मोठ्या संख्येने युजर्स फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावर जान्हवीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील तिचा बोल्ड अंदाज पाहून नेटकरी क्लीन बोल्ड झाले आहेत.

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचा हा बोल्ड लूक शेअर केला आहे. नुकतीच ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेची संपूर्ण टीम लोणावळ्यात पावसाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. टीमसोबत जान्हवी देखील लोणावळ्याला गेली होती आणि येथील काही फोटो तसेच व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या व्हिडीओत जान्हवी किल्लेकर स्विमिंग पूलमध्ये पावसाचा आनंद घेताना दिसते आहे. यावेळी तिने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

मालिकांमध्ये साडीत वावरणारी जान्हवी शॉर्ट ड्रेसमध्ये बिंधास्त वावरताना दिसतेय. त्यामुळे अचानक जान्हवीला बोल्ड अंदाजात पाहून सगळेच थक्क झाले आहेत. जान्हवीच्या या व्हिडिओसोबत तिने ‘हॉट’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तर या व्हिडीओवर एका युजरने लिहिले आहे की, ‘जान्हवी तुझी अदा खतरनाक…’. तर आणखी एकाने लिहिले, ‘भर पावसाळ्यात वणवा पेटवला’. तसेच आणखी एका युजरने लिहिलंय, ‘पाण्यातून वाफा आल्या बाहेर…’. तर अशाच आणखी एकाने लिहिले, ‘आजपर्यंत जानविला एवढं हॉट कधीच पहिले नव्हते’. तर अन्य एकाने म्हटले, ‘आपण जागतिक तापमान वाढीेस हातभार लावत आहात याची आपणाला कल्पना आहे का?’