राणा दा’च्या कार्यक्रमात सहभागी होणार ‘पापा की परी’; आता येईल मजा.. का वाटेल सजा..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हार्दिक जोशी एका नव्या रिऍलिटी शोच्या माध्यमातून ‘झी मराठी’ वाहिनीवर कमबॅक करतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या या आगामी कार्यक्रमाचे काही प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले. ज्यामध्ये हार्दिकचा रांगडा अंदाज पाहून प्रेक्षकांची कार्यक्रमाबाबतची उत्सुकता वाढली. ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार’ अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमाचे नाव ‘जाऊ बाई गावात’ असे आहे. यामधील पहिल्या दोन स्पर्धकांची नाव आता समोर आली आहेत.

हार्दिक जोशीचा हा नवा रिअ‍ॅलिटी शो नक्की काय असणार..? याबाबत अजून नेमकं काही सांगता येत नसलं तरी काहीतरी भन्नाट थीम घेऊन हार्दिक मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे, यात काही शंका नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हार्दिक जोशी त्याच्या रांगड्या अंदाजात करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचा लाडका राणा दा पुन्हा एकदा भेटणार आहे. अशातच आता या शोमधील दोन दमदार स्पर्धकांची ओळख समोर आली आहे. शिवाय हा शो कधीपासून सुरू होणार..? हे देखील सांगण्यात आले आहे. ‘झी मराठी’वरील ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिअ‍ॅलिटी शोचा आज एक नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये या स्पर्धकांची ओळ करून देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/reel/Czvyz9zPy71/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

‘एक आहे पापा की परी संस्कृती साळुंखे. जिचा चॉईस महाग आहे आणि तिला क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा प्रचंड अभिमान आहे. ती म्हणते कि, तिच्यासमोर कोणी काहीही लपवू शकत नाही. तर दुसरी स्पर्धक श्रीमंत घरची नात स्नेहा भोसले. जिला घरात सगळेच घाबरतात. ती जवळपास लेडी डॉन आहे. तिला किक बॉक्सिंग आवडते. अशा या ऐशोआरामात वाढलेल्या शहरी मुली गावातलं आयुष्य कशा जगणार..? हे ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये पहायला मिळणार आहे. ‘जाऊ बाई गावात’ हा शो २७ नोव्हेंबर २०२३ पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.