औक्षण, फुलांची आरास अन चमचमीत जेवण..; जवादे भावंडांनी केलं प्रसाद- अमृताचं केळवण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी ठरली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनामनांत जागा मिळवली. बिग बॉसच्या घरात मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेले प्रसाद- अमृता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान त्यांचा साखरपुडा पार पडला असून अवघ्या काहीच दिवसांवर त्यांच लग्न येऊन ठेपल आहे. दरम्यान त्यांच्या केळवणाचे कार्यक्रम पार पडत असून त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

नुकतंच प्रसाद जवादेच्या भावंडांनी त्याच आणि अमृताचं केळवण मोठ्या आनंदाने अन उत्साहाने केले. जवादे भावंडानी आयोजित केलेला हा केळवणाचा कार्यक्रम कदाचित या जोडप्याचं अंतिम केळवण असेल. कारण येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी ही जोडी लग्न बंधनात अडकणार आहे. अमृताने या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अमृताने हि व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे कि, ‘कदाचित हे शेवटचं केळवण असेल..’.

अभिनेता प्रसाद जवादेची भावंड अमेय आणि प्रिया यांनी त्याच्या केळवणाचा जंगी घाट घातला होता. अमृताने शेअर केलेल्या पोस्टवरून शेवटचं केळवण एकदम जोरदार पार पडल्याचं दिसत आहे. आतापर्यंत अमृता आणि प्रसाद यांच्या केळवणाचे अनेक व्हिडीओ तसेच फोटो व्हायरल झाले आहेत. यात जवादे भावंडांच्या केळवणाचा देखील समावेश झाला आहे. अमृताची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चाहते आणि नेटकरी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.