‘मुसाफिरा’ चित्रपटातील मैत्री सेलिब्रेट करणारं ‘झिलमिल’ गाणं रिलीज; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून मैत्रीवर आधारलेला ‘मुसाफिरा’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘मुसाफिरा’ आणि ‘मन बेभान’ हि दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्यानंतर आता चित्रपटातील तिसरे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे नाव ‘झिलमिल’ असे असून हे बहारदार गाणे सलीम मर्चंट यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविडचे असून साई – पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या निसर्गरम्य वातावरणात हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत आणि या गाण्यातून त्यांची घनिष्ट मैत्री पहायला मिळतेय. या गाण्यात सफरीवर निघालेले हे ‘मुसाफिरा’ जीवनाचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर अत्यंत सुंदर शब्दांच्या माध्यमातून या गाण्यात मैत्रीतील प्रेम दर्शवले आहे. हे गाणं जितकं सुरेल आहे, तितकंच चित्रीकरण स्थळही आकर्षक आहे. या गाण्याबद्दल अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोगने भावना व्यक्त केल्या आहेत.

या गाण्याविषयी बोलताना पुष्कर जोग म्हणाला कि, ‘ ”झिलमिल” हे गाणे खरंच खूप भारी आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या एका सुंदर ठिकाणी आम्ही याचे चित्रीकरण केले आहे. कोणीही प्रेमात पडेल असे हे स्थळ आहे. हे गाणे ऐकताना आणि पाहताना आपण स्वतःही तिथेच असल्याचा भास होईल. ही सफर आमच्यासाठीही खूप खास होती. हे गाणे ऐकताना तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराची आठवण आल्याखेरीज राहाणार नाही’. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’चे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे.