Jhimma 2 | ‘झिम्मा २’ची विक्रमी चाल, बॉक्स ऑफिसवर केला 10 कोटींचा गल्ला पार


Jhimma 2 | 2023 हे वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी अत्यंत खास ठरले आहे. कारण यावर्षी अनेक मराठी चित्रपटांनी खूप चांगले बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केले आहे. इतकच नाही तर प्रेक्षकांना देखील या चित्रपटाची भुरळ पडली आहे. आणि त्यातील सेक्स सिनेमा म्हणजे झिम्मा 2. बॉलीवूडचे सिनेमे असताना झिम्मा 2 ने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आणि या चित्रपटाने आतापर्यंत खूप चांगली कमाई केली आहे.

2023 मध्ये झिम्मा 2 हा ब्लॉकबस्टर ठरला असून या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई केलेली आहे. सर्वात जास्त कमाई करणारा झिम्मा 2 हा दुसरा चित्रपट आहे या चित्रपटाने आतापर्यंत 14 कोटींची कमाई केलेली आहे.

हेही वाचा – मनसोक्त हसणारी ‘पारू’.. बिनधास्त जगणारे ‘शिवा’; झी मराठीवर सुरु होणार दोन नव्या मालिका

आनंद एल रॉय यांची निर्मिती असलेल्या झिम्मा 2 या चित्रपटाने देश-विदेशात देखील लोकप्रियता मिळवलेली आहे. याआधी या चित्रपटाचा पहिला भाग देखील प्रदर्शित झाला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या भागाची देखील प्रेक्षकांना आतुरता होती. आणि या चित्रपटाने खूप चांगले यश मिळवले आहे. हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेल्या हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या सिनेमांमध्ये सुहास जोशी, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत,रिंकू राजगुरू या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.