Jhimma 2 | मिताली मयेकरने केले ‘झिम्मा 2’चे कौतुक; म्हणाली, ‘काय चित्रपट, काय स्टारकास्ट…’


Jhimma 2 |संपूर्ण महाराष्ट्र ‘झिम्मा 2’ हा चित्रपट गृहात प्रदर्शित झालेला आहे. आणि दिवसापासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अशातच २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. चित्रपटाचा पोस्टर ट्रेलर सगळेच प्रेक्षकांना आवडले होते. तसेच ‘झिम्मा 2’मधील गाणी देखील प्रेक्षकांना खूप चांगली आवडली होती.

हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा 2’या चित्रपटाचा कौतुक अख्या महाराष्ट्रभर होत आहे. अशातच आता अभिनेत्री मिताली मयेकर हिने ‘झिम्मा 2’साठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ‘झिम्मा 2’सिनेमाची तसेच कलाकारांचे देखील कौतुक केलेले आहे.

तिने ही पोस्ट शेअर करून लिहिलेले आहे की, “काय चित्रपट, काय स्टारकास्ट खूपच भारी झिम्मा 2 चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला आहे हा चित्रपट नक्की बघा संपूर्ण टीमचा अभिनंदन आणि शुभेच्छा.” अशाप्रकारे तिन्ही पोस्ट शेअर केलेली आहे.

हेही वाचा – ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एंट्री; प्रोमो झाला व्हायरल

झिम्मा 2 या चित्रपटात तगडी स्टार कास्ट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोक, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सुहास जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे काही वर्षांपूर्वी आलेला. हा चित्रपट देखील संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता आता देखील चांगलीच कमाई करताना दिसत आहे.