Jhimma 2 | निर्मिती सावंत यांना गाडी चालवता येत नसताना चित्रपटात कशी चालवली? जाणून घ्या


Jhimma 2 | सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची हवा आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2021 मध्ये झिम्मा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता दोन वर्षांनी त्याचा सिक्वेलरी झाला आहे. प्रेक्षकांना ही कहाणी देखील खूप आवडली आहे. सात बायकांच्या रियुनियनची ही गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीचा उतरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला वर्ग थेटरकडे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहे.

झिम्मा 2 मधील गाणी तसेच त्यातले सिन व्हायरल झाले. आहे त्यातीलच एक सीन म्हणजे निर्मिती सावंत आणि सुचित्रा बांदेकर यांच्या गाडी चालवतानाचा सीन आहे. तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ट्रेलरमध्ये सगळ्यांनी झलक पाहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे या सीनमध्ये निर्मिती सावंत त्यांनी अनेक वर्ष गाडी चालवलेली नसती. परंतु लंडनच्या रस्त्यावर गाडी चालवली आणि त्या गाडी ठोकल्याची दिसत आहे. चित्रपटात निर्मिती सावंत यांनी गाडी ठोकली. परंतु त्यांना खऱ्या आयुष्यात गाडी चालवता येत नाही. झिम्मा 2 च्या प्रमोशनदरम्यान हेमंत ढोमे यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- भालचंद्र नेमाडेंची कादंबरी ‘कोसला’ झळकणार रुपेरी पडद्यावर; नव्या चित्रपटाची घोषणा

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखती त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, “निर्मिती मावशीला गाडी चालवता येत नाही. त्या तिला परदेशात गाडी चालवायची होती. जेव्हा तिने स्क्रिप्ट ऐकली तेव्हा ती खुप असते नंतर मग तिने रात्री मला गुपचूप फोन केला. मला तर गाडी चालवता येतच नाही मग तू हे शूट कसं करणार असं ती मला म्हणाली, यावर मी तिला माझ्याकडे त्यामागचे माध्यम आहे असं म्हणालो. नावाची एक गाडी असती त्याच्यावर आपण गाड्या लोड करून सिम शूट करू शकतो. पण गाडी चालवताच येत नसल्यामुळे आणि तसेच ज्ञान नसल्यामुळे निर्मिती मावशीने त्यासीन मध्ये जे केलंय त्यामुळे आणखी मजा येते.”

हा चित्रपट 24 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलं धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने आतापर्यंत 4.77 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात आपल्याला मोठ्या प्रमाणात स्टार कास्ट पाहायला मिळत आहे.