Jhimma 2 | ‘तुम्ही खरंच दारू पिली होती का?’ झिम्मा 2 मधील ‘त्या’ सीनवर निर्मिती सावंत यांनी सोडले मौन


Jhimma 2 | सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवीन चित्रपट येत आहे. अशातच हेमंत ढोमे यांचा ‘झिम्मा 2’ चित्रपट देखील येत्या काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. येत्या 24 नोव्हेंबर रोजी चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री या चित्रपटात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन चालू आहे.

त्यामुळे चित्रपटाचे कलाकार आणि कार्यक्रमात पोचतात. अशा वेळी सगळ्या अभिनेत्रींनी चित्रपटाच्या सेटवरील किस्से सोशल मीडियावर सांगितले आहे तसेच कार्यक्रमात सांगितले आहे. अशातच अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी देखील दारू पिऊन एक सीन शूट केला आहे. त्यांचा हा त्यांनी खरच दारू पिऊन शूट केला होता का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आणि याचे उत्तर आता त्यांनी दिले आहे. नुकतेच झिम्मा 2 मधील कलाकरांनी एका माध्यमांना मुलाखत दिली यावेळी त्यांना सिनेमांमध्ये निर्मिती सावंत यांनी खरी दारू पिली होती का असे विचारण्यात आले.

झिम्मा 2चा ट्रेलरमध्ये निर्मिती सावंत एका सीनमध्ये दारू पिताना दिसत आहे. हा सीन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इतकेच नाही तर त्याच्यावरून अनेक मीन्स देखील तयार करण्यात आले आहे.

यावेळी माध्यमांना उत्तर देताना निर्मिती सावंत यांनी सांगितले की, “तुम्हाला सगळ्यांनाच माझ्या या गोष्टीची मजा वाटेल पण मला दारू सिगारेट तंबाखू आणि अगदी चहा सुद्धा यापैकी कसलाच व्यसन नाहीये. मला माहित नाही कसं पण ते दारूचे सीन माझ्याकडून खूप छान होतात. मला बरेच जण विचारतात अगं मला असं वाटतं की निरीक्षणामुळे असं असेल का? तर नाही कारण मी कधीच असं कोणाचं निरीक्षण केले नाही. विचार केला की, निर्मला गावची मोकळी ढाकळी बाई आहे तिने जर अशी दारू प्यायली तर तिला चढली तर ती कशी मागे येईल बिचारी. हे लोकांना आवडलंय ना मी जशी टेलरमध्ये असते. तसे आपोआप आले मी फक्त स्वतःला बजावते की तू निर्मला कोंडे पाटील आहे.”

पुढे द्या म्हणाला की, मग त्या रिएक्शन लोकांना आवडतात एका सिनच्या वेळी तर मी हेमंतला बाहेर काढलं होतं. कारण तू हसत होता. त्याचा हसू पाहून मला हसू येत होतं. एका सिनला तर आमचा डीपीओ हेमंत याच्या खांद्याला चावला कारण आमचे सीन पाहून त्याला इतक हसू येत होतं की हसू बाहेर पडू नये म्हणून त्यांनी चक्क खांद्याचा चावा घेतला.

याआधी झिम्मा हा चित्रपट रिलीज झाला आहे. आता या चित्रपटात निर्मिती सावंतz रिंकू राजगुरू, शिवानी सुरवे, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिति जोग, सुहास, सिद्धार्थ चांदेकर ही कलाकार मंडळी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.