Jitendra Joshi |नुकतेच नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे विश्वचषक 2023 चा सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत असा सामना चालू होता. वर्ल्ड कप आपल्या देशातील असे वाटतात ऑस्ट्रेलियाकडून भारताला खूप मोठी हार पत्करावी लागली. गेले बारा वर्षे भारत वर्ल्ड कपची वाट पाहत आहेत . भारताने यावर्षी सलग दहा सामने जिंकले परंतु अंतिम फेरीमध्ये पराभव झाल्यामुळे भारतीय क्रिकेटर्समध्ये तसेच सगळ्या प्रेक्षकांमध्ये त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली आहे. अनेक जण टीम इंडियाला ट्रोल देखील करत आहे. परंतु या नाराजीच्या वातावरणामध्ये अभिनेता जितेंद्र जोशी यांनी टीम इंडियासाठी एक पोस्ट केली आहे. जी सध्या सगळ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उपयोगी ठरत आहे.
जितेंद्र जोशी आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. यावेळी त्यांनी लिहिले आहे की, “आता प्रभावा नंतर काहीजण आपल्या संघाला वाईट कमेंट करतील त्यांच्याबद्दल चर्चा करतील टीका करतील काही नेटकरांनी तर आधीच बालीश बनवले आहेत. पण या सगळ्या सीरिजमध्ये आपल्या संघाने उत्तम कामगिरी केली. हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या टीमला मला प्रचंड अभिमान आहे. कारण एकही सामना न गमवता त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. आपण यंदाही जिंकू असा विश्वास आपल्यात निर्माण केला. आपल्याला स्वप्न दाखवली आपण सगळेच एक प्रेक्षक आणि कुटुंब म्हणून एकत्र आलो.”
पुढे त्याने लिहिले की, “शेवटी हा एक खेळ आहे कोणी एकाला जिंकण्यासाठी कोणाला तरी हार मानावीच लागते. हा दिवस जरी आपला नसला तरी सुद्धा आपली टीम खूप छान खेळलेली आहे. आता मी दुःखी आहे पण त्या खेळाडूंकडे आपले दुःख काहीच नाही. त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्या सगळ्यांच्या वतीने ते मैदानात खेळले. या विश्वचषकात आपण उत्तम ठरलो नाही. याचा अर्थ आपण हरलो असा होत नाही माझा माझ्या टीमला कायम पाठिंबा आहे मी कायम त्यांच्या सोबत आहे.”
हेही वाचा- ‘… म्हणून शिंगणापूरच्या मंदिराला घुमट किंवा कळस नाही’; अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ पोस्टचे कॅप्शन चर्चेत
यासोबत जितेंद्रने भारतीय टीमला सपोर्ट करण्यासोबत ऑस्ट्रेलियाच्या टीमचे देखील अभिनंदन केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. अनेकजण त्याला पाठिंबा दर्शवत आहेत आणि आपल्या भारतीय टीमचे कौतुक देखील करत आहेत.