हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर चांगली छाप उठवली. या चित्रपटाच्या शेवटी अधुरी राहिलेली गोष्ट आता ‘नाळ भाग २’च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि २ टिझर रिलीज झाले आहेत. यातील पहिला टिझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली होती. यानंतर नुकताच या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला आहे. ज्यावर अभिनेता जितेंद्र जोशीने प्रतिक्रिया दिली आहे.
‘नाळ भाग २’च्या टीझरमध्ये चैत्या आणि त्याची खरी आई यांच्यातील एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. जो पाहून चैत्या आणि त्याच्या आईमधील अबोला दूर झाला असावा.. असा अंदाज वर्तवला जात आहे. पण खर्च त्यांच्यातील अबोला मिटला असेल का..? त्यांच्या नात्यात सुसंवाद आला असेल का..? असा प्रश्न अनुत्तरित राहतो आहे. दरम्यान या चित्रपटाचा हा टीझर पाहून मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याची प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
‘नाळ भाग २’ या चित्रपटाचा टीझर पाहून अभिनेता जितेंद्र जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने ‘नाळ भाग २’चा टिझर शेअर करताना लिहीलं आहे कि, ‘ती चैतू सोबत बोललीच नाही त्यामुळं मला लई राग आला होता तिचा.. चैतु पहात राहिला आणि मी रडत .. आता मोठा झालाच आहे तर बोल गं बाई त्याच्याशी.. खूप खूप शुभेच्छा मित्रांनो.. पहिल्या भागाच्या आठवणींचा खजिना मोठा चैत्या पुन्हा उलगडणार, येत्या दिवाळीत नात्यांची नाळ अजून घट्ट होणार!’ छोट्या चैतूचे गोड बोल आणि भावनांनी आधीच प्रेक्षकांना गळ घातली आहे. त्यामुळे १० नोव्हेंबर २०२३ रोजी थिएटर फुल्ल होणार यात काही शंका नाही.