‘तुमच्या घरात कचरा टाका आणि त्यातच रहा…’; माथेरानमधील ‘ते’ दृश्य पाहून जुई गडकरी भडकली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मध्यंतरी मोठ्या ब्रेकनंतर तीने ‘ठरलं तर मग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. सध्या या मालिकेत कथानकाच्या गरजेप्रमाणे हनिमूनचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. या निमित्त मालिकेची संपूर्ण टीम माथेरानाला गेली होती. दरम्यान या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र अहिनेत्री जुई गडकरीचा संताप झाला आणि तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत येणाऱ्या पर्यटकांना चांगलंच सुनावलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान हनिमून च्या सिक्वेन्ससाठी कलाकार मंडळी मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या निसर्गरम्य माथेरानमध्ये मालिकेच्या टीमसोबत गेली होती. शूटिंग दरम्यान, जुईला माथेरानमध्ये अनेक ठिकाणी पर्यटकांनी अत्यंत घाणेरड्या आणि बेशिस्त पद्धतीने अस्वच्छ केलेला परिसर आढळला. यावेळी रस्त्याच्या आजूबाजूला पडलेला कचरा पाहून जुई गडकरींच्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणाची झालेली दुरावस्था पाहून संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री जुई गडकरीने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘चांगले पर्यटक व्हा! चांगले नागरिक अन् सगळ्यात आधी चांगले माणूस व्हा! निसर्गाची काळजी घ्या… तरच निसर्ग आपली काळजी घेईल. रस्त्यावर जागोजागी मला असा कचरा आढळला. हे लोक कचरा पेट्यांमध्ये कचरा फेकू शकत नाहीत का..? एवढ्या सुंदर जागेवर निर्माण झालेलं हे प्लास्टिकच साम्राज्य पाहून खरंच खूप दु:ख होतं. मित्रांनो! असा कचरा करण्याआधी यापुढे खरंच थोडातरी विचार करा. तसेच कचरा इतरत्र टाकणं थांबवता येत नसेल तर प्लिज आपल्या घरात तो आवश्य फेका आणि त्यातच रहा!’. जुईने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या मताला समर्थन दिले आहे.