हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये अभिनेत्री जुई गडकरी ‘सायली’ हि मध्यवर्ती भूमिका साकारते आहे. मालिकेला आणि तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या माध्यमातून एका मोठ्या ब्रेकनंतर जुई गडकरी पुन्हा मालिका विश्वात परतली. दरम्यान, जुई गडकरी व्यस्त शेड्यूमधून वेळ काढून उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली. सोशल मीडियावर तिने उज्जैन सफरीचे फोटो शेअर केले आहेत.
मध्य प्रदेशातील प्रमुख शहर उज्जैन येथील महादेवाचे महाकालेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे. जिथे शिव शंभोचे भक्त मोठ्या संख्येने श्रद्धेसहीत महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. नुकतंच स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरी उज्जैनला पोहोचली आहे. यावेळी तिने महाकाल, ओमकारेश्वर, मामलेश्वर, मंगलनाथ, कालभैरव, नवग्रह, सांदीपनी आश्रम, खजराना, राजबाडा! या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. यापैकी महाकालेश्वर हे भगवान शंकरांचे सर्वात पवित्र आणि जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते.
अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर उज्जैन सफरीचे फोटो शेअर केले आहेत. यातीळ काही फोटोंमध्ये जुईने पोपटी रंगाची सुंदर अशी साडी नेसल्याचे दिसत आहे. तर एका फोटोत तिने पांढऱ्या- निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच आणखी एका फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. शिवाय पुढील फोटोत काही मंदिरं दिसत आहेत. जुईने या फोटोंसोबत # Happy Me, # Go Solo, # Positive Vibes असे हॅशटॅग दिले आहेत. तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.