अभिनेत्री जुई गडकरीने ‘अशी’ पार पाडली मावशीची ड्युटी; CUTE व्हिडीओने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली हि भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. यामुळे मालिकेचे अपडेट, नव्या प्रोजेक्ट्सची माहिती यासह अनेकदा ती वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग, अनुभव आपल्या चाहत्यांसोबत याच माध्यमातून शेअर करते. आताही तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जुई तिच्या भाचीसोबत दिसते आहे.

जुई गडकरी तिच्या अभिनयाइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत असते. शिवाय ती सोशल मीडियावर लहान मोठे प्रसंग शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते. आता जुईच्या या नव्या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा आहे. जुई गडकरीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका लहान मुलीला खेळवताना दिसत आहे. ही लहान मुलगी जुईच्या बहिणीची मुलगी असून तिची लाडकी भाची आहे. घरात कार्यक्रम सुरु असताना जुईने भाचीला सांभाळायची जबाबदारी पार पाडल्याचे यात दिसत आहे.

जुईने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मावशी ड्युटी!!! दत्त जयंतीला घरी भजन सुरू असताना आमच्या ”प्रचिती” ला असं फिरायचं होतं. गंमत म्हणजे ती भजन सुरू असताना एकदाही रडली नाही. ती छान रमली होती. तेवढाच आमच्या सखीला free time मिळाला!!! पण माझा वेळ पिल्लाबरोबर खूप छान गेला’. जुईचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि यावर अनेक चाहते कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.