‘दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा…’; जुई गडकरीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रचंड टीआरपी असलेली ‘ठरलं तर मग’ हि मालिका फार लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुई गडकरी पुन्हा एकदा मालिका विश्वात झळकली आहे. ती साकारत असलेल्या सायली या भूमिकेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जुई एक लोकप्रिय चेहरा असल्यामुळे तिचा चाहता वर्ग आहे फॉलोवर्स मोठ्या संख्येत आहेत. दरम्यान जुईने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

अभिनेत्री जुई गडकरी कलाविश्वाइतकीच सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. त्यामुळे अभिनयाबरोबरचं तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती अनेकदा चर्चेत येत असते. विविध पोस्ट शेअर करत ती प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील गोष्टी शेअर करताना दिसते. दरम्यान तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट शेअर केली होती. जी चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने जे लिहिलंय ते नेमकं कुणासाठी याचा अंदाज लावता येत नसला तरीही हि पोस्टने लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे.

अभिनेत्री जुई गडकरीने हि स्टोरी पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा स्वत:ची सुधारणा केली, स्वत:च्या प्रगतीकडे लक्ष दिलं तर खूप सकारात्मक बदल होतात. त्यामुळे आपली शक्ती कुठे लावायची हे नीट ठरवायला पाहिजे’. आता जुईची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असली तरीही नेमकी ती कुणासाठी आहे याबाबत काही अभिनेत्रीने खुलासा केलेला नाही. त्यामुळे जुईने ‘समझने वाले को इशारा काफी है…’ याचा अवलंब केला आहे हेच समजणे योग्य राहील.