हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिंगिंग रिऍलिटी शो ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रकाशझोतात आलेली कार्तिकी कल्याणजी गायकवाड तिच्या सुमधुर स्वरामुळे रसिकांची लाडकी आहे. आतापर्यंत कार्तिकीच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. लग्नानंतरही कार्तिकीने तिची गायकी आहे तशीच सुरु ठेवल्यामुळे ती कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण या सगळ्यातून वेळात वेळ काढून कार्तिकी आणि तिचा पती रोनित पिसे इंडोनेशियातील ‘बाली’ या पर्यटनस्थळी फिरायला गेले आहेत.
लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड- पिसेने तिच्या या स्पेशल रोमँटिक ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कार्तिकीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. इंडोनेशियामधील ‘बाली’ हे आशियाई देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी नेहमीच कपल्स त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी जातात. कार्तिकी आणि रोनित देखील असेच एकांताचे काही मौल्यवान क्षण एकत्र घालवण्यासाठी बालीच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी गेले आहेत.
कार्तिकीने शेअर केलेल्या बाली ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कार्तिकीने गुलाबी रंगाचा अतिशय सुंदर गाऊन परिधान केला आहे. तर रोनितने कार्तिकीच्या ड्रेससोबत मॅचिंग ठरेल असं शर्ट परिधान केलं आहे. दोघांचं हे कपल ट्विनिंग फारच सुरेख आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहेत. या फोटोंसोबत ‘The Gates Of Heaven’ असं कॅप्शन कार्तिकीने दिलं आहे.
बाली हे इंडोनेशिया या मुस्लीम राष्ट्रात असले तरी येथे जवळपास ९५ टक्के हिंदू लोकांचे वास्तव्य आहेत. तसेच इथे हजारपेक्षा जास्त मंदिरे आहेत. यावेळी कार्तिकी आणि रोनितने मंदिरांसह बालीच्या समुद्रकिनारी खास पोझ देत फोटोशूट केले आहे. जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.