‘मायदेशी परतण्याचे वेध लागलेत….’; 3 महिने परदेशात राहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या निखळ सौंदर्याने आणि कमालीच्या अभिनयासह प्रेक्षकांच्या मनावर गेली अनेक वर्ष राज्य करणाऱ्या अभिनेत्री कविता लाड- मेढेकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेमुळे घराघऱात पोहचल्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमधून, नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आताही कविता झी मराठीच्या ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. सोबतच त्यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग देखील सुरु आहेत.

‘एका लग्नाची पुढची गोष्टी’ या नाटकाच्या प्रयोगानिमित्त कविता लाड- मेढेकर या संपूर्ण टीमसोबत परदेश दौऱ्यावर होत्या. तब्बल ३ महिने परदेश दौरा केल्यानंतर आता मात्र त्यांना मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत. अभिनेत्री कविता मेढेकर या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ त्या आवर्जून पोस्ट करत असतात. नवरात्रीनिमित्त कविता यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअऱ केला आहे. सोबतच आता मायदेशी परतण्याची वेध लागलेत म्हणत भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हि पोस्ट शेअर करताना कविता मेढेकर यांनी आपला एक पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. सोबत लिहिलं आहे कि, ‘३ आठवड्यांचा झंझावती आणि यशस्वी अमेरीकेचा नाटकाचा दौरा करून आता मायदेशी परतण्याचे वेध लागलेत. Last Minute मुलांचं shopping झालं, Bags भरून झाल्या.. आता घर,आपली माणसं, सण असं सगळं साजरं करायचयं… भुवनेश्वरीच्या पात्रात विविध रंग भरायचेत! BTW आजचा नवरात्रीचा रंग पांढरा आहे आणि मी शुभ्र पांढऱ्या ढगांसोबत आजचा पांढरा रंग साजरा करतीये’. कविता सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत ‘भुवनेश्वरी’ हे पात्र साकारत आहेत आणि या पात्राला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे.