Ketaki Chitale |सध्या राज्यभर मराठी आरक्षणाचे वादळ पसरलेले आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटलांनी या आरक्षणाला सुरुवात केली आणि त्यांच्या पाठोपाठ समस्त मराठी बांधवांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही म्हणजेच आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत त्यांनी उपोषण केले आहे. त्यांनी यामध्ये पाणी देखील न पिण्याची भूमिका घेतलेली आहे.
हे आंदोलन शांततेत चालू होतं परंतु या आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसापासून शांततेत आंदोलन चालू असले तरी काही ठिकाणी जाळपोळाच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी बस देखील फोडण्यात आलेली आहे.
हेही वाचा – गिरीश परदेशी यांच्या बॉलिवूड स्टाईल नाटकाला कलाकारांच्या शुभेच्छा; कधी आहे शुभारंभ प्रयोग..? जाणून घ्या
या आंदोलनावर आजपर्यंत अनेक मराठी कलाकारांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. अशातच अभिनेत्री केतकी चितळे हिचे वक्तव्य आता समोर आले आहे. केतकीने सोशल मीडियावर याबाबत अप्रत्यक्षपणे भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
काय आहे केतकी चितळेची पोस्ट | Ketaki Chitale
यावर केतकी चितळेने पोस्ट केली आहे की, “सरकारकडे मागणी करा. सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एसटी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण? चुकून दगड चालकाला लागला असता तर?” केतकीने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
तिच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांना तिचे म्हणणे पटले आहे, तर काहीजण मात्र तिच्या या पोस्टमुळे नाराज झाले आहे. यावर एका युजरने कमेंट केली आहे की,” मराठा समाज शांततेत आंदोलन करत होता मोर्चा काढत होता तेव्हा कोणाला समजलं नाही त्यामुळे मराठा समाजाने हा मार्ग अवलंबला आहे.”
अशा अनेक प्रकारे यूजर सोशल मीडियावर त्यांचे मत व्यक्त करत आहेत. अनेकांना तिचे म्हणणे पटलेले नाही सरकारने लक्ष दिले नाही म्हणूनच आज ही वेळ आली आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.