केतकी चितळेचा आगाऊपणा; अभिनेत्रीने दीप अमावास्येला शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात अभिनयापेक्षा वादग्रस्त विधाने, सोशल मीडिया पोस्ट यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमवारी १७ जुलै २०२३ रोजी ‘दीप अमावस्या’ होती आणि यानिमित्त केतकीने एक पोस्ट शेअर केली होती. जी व्हायरल होते आहे. केतकी चितळेने या पोस्टमध्ये ३ फोटो शेअर केले आहेत. यातील एकात तिने घरात केलेल्या दीप अमावस्या पूजनाचे फोटो शेअर केले आहेत. तर बाकी फोटोंंमध्ये केतकी पीठाचे दिवे खातेय.

अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘माझी दंत कथा, भाग ४: … ३ दात काढले आहेत. बोलता येत नाहीये, नीट काही खाता येत नाहीये, मळमळ, वर्टीगो, सर्व चालू आहे त्या एंटिबायोटिक्स मुळे. इलाज नाही कारण एपिलेप्सी औषधे व ही औषधे एकमेकांबरोबर क्लॅश होतात! पण, आज दीप पूजन म्हंटल्यावर दिवे तर झालेच पाहिजेत. आगाऊपणा बघा, तोंड उघडता येत नसले तरी दिवे खायचे नाही, असे कसे!! तुम्हा व तुमच्या परिवारास दिव्याच्या अवसेच्या शुभेच्छा!!”

केतकीने अशी पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे तिची डेंटल ट्रीटमेंट सुरु आहे. ज्यामुळे हिरड्यांना सूज असल्याने ती लिक्विडशिवाय इतर कोणतेही पदार्थ खाऊ शकत नाहीये. पण तरीही पिठाचे दिवे खायचे म्हणून केतकीचा अट्टाहास सुरु आहे. केतकीच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यातील अनेकांनी तिला ‘काळजी घे’, ‘लवकर बरी हो’, ‘लवकर रिकव्हर हो’ असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘काय परिस्थिती आहे बघा. तोंड ही उघडता येत नाही. हे नक्की कोणासाठी बघा बाबा…! तेच आपले जुने साहेब का?’