किरण मानेंनी विकत घेतली नवी कोरी मर्सिडीज; फोटो शेअर करत म्हणाले, ‘ही मोठी गोष्ट नाही..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने हे मालिका विश्वातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. शिवाय ते सोशल मीडियावर देखील चांगलेच चर्चेत असतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सिने सृष्टीतील विविध मुद्द्यांवर किरण माने वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत व्यक्त होताना दिसतात. मध्यंतरी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेदरम्यान झालेल्या वादविवादांमुळे किरण माने चर्चेत आले. त्यानंतर बिग बॉस मराठी सीजन ४’मधून किरण मानेंनी उत्तम खेळ दाखवत प्रसिद्धी मिळवली. आज किरण माने यांनी आपले एक स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या स्वप्नपूर्तीची माहिती दिली आहे. अभिनेता किरण माने यांनी आलिशान नवीकोरी शानदार अशी मर्सिडीज बेंझ कार खरेदी केली आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर किरण माने यांनी आपल्या नव्या कोऱ्या आलिशान कारसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत माने यांनी कॅप्शनमध्ये आपले स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले आहे.

अभिनेता किरण माने यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या नव्या आलिशान मर्सिडीज बेंझ कार सोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. यासोबत किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘माझ्या मित्रांनो ही काही मोठी गोष्ट नाही… पण मला ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे… मी माझ्या किशोर वयात असताना मर्सिडीज बेंझ हे माझे स्वप्न होते… आता ते माझे वास्तव आहे! माझ्या प्रिय ‘मर्स’, आमच्या कुटुंबात स्वागत आहे’. अशी पोस्ट शेअर करत किरण मानेंनी स्वप्नपूर्तीची माहिती दिली आहे.