हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. किरण मानेंनी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत ‘अभिमान साठे’ म्हणजेच अण्णाजींची भूमिका साकारली. त्यांची हि भूमिका प्रचंड गाजली. यानंतर आता किरण माने लवकरच नव्या मालिकेतून एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
अभिनेता किरण माने यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आगामी नव्या भूमिकेची माहिती दिली आहे. सोबतच नव्या भूमिकेचा लूक शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये किरण माने एका कारमध्ये बसलेले दिसत आहेत. यात त्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डोळ्यावर गॉगल लावलेला दिसतोय. एकंदरच त्यांचा हा लूक दमदार आहे. पण अजून हा लूक नेमका कोणत्या भूमिकेसाठी आहे ते समोर आलेले नाही.
किरण मानेंनी या भूमिकेतील फर्स्ट लूक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आणखी एक भन्नाट भूमिका!! नादखुळा लूक.. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… स्टे ट्यून्ड’. किरण मानेंचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चाहते वेगवेगळे तर्क लावत आहेत. कुणी हा लूक आगामी सिनेमातील असेल म्हणतोय, तर कुणी हा लूक आगामी मालिकेतील असेल असा अंदाज लावतोय. पण अजूनही किरण माने यांनी आपल्या भूमिकेबद्दल इतर कोणतीही माहिती दिलेली नाही.