लेकासोबत रंगली किरण मानेंची मैफिल; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘भान हरपून गायला लागलो…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने हे अत्यंत लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहेत. शिवाय ते सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित प्रत्येक विषयावर ते आवर्जून मत व्यक्त करताना दिसतात. अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील व्यक्त होताना दिसतात. नुकतीच त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलाचे भरभरून कौतुक केले आणि आशीर्वाद दिले आहेत.

किरण माने यांनी आपल्या मुलासाठी लिहिलं, ‘ ”…जो मज़ा अपने बेटे को जवान होते देखकर आता है… वो अपनी जवानी में भी नहीं आता!!!” काय डायलाॅग ल्हीलाय भावांनो गुलज़ारसायेबांनी… लैच जबराट. लेकराचा आज वाढदिवस. आज खर्‍या अर्थानं ‘टीनएजर’ झाला ह्यो वाघाचा बछडा. तेरा पूर्ण करून चौदाव्या वर्षात पाऊल ठेवलं. रात्री बारा वाजता छोटं सेलीब्रेशन केलं. हातात गिटार घेऊन मला म्हन्ला, ”बाबा तुमी माझ्या वयाचे होता, त्यावेळी तुमचं जे आवडतं गाणं होतं, ते म्हणा”.

‘एका मिन्टात त्या वयात गेलो. अंगात लगीच बच्चन संचारला. भान हरपून गायला लागलो… “इन्तेहाS हो गयी… इंतज़ार की… आई ना कुछ खबर… मेरे यार की..” … आणि त्यावर आरूषनं गिटारची साथ दिली!!! लै नादखुळा माहौल झाला घरात. ईशानं आमची ती मैफल कॅमेर्‍यात कैद केली. लब्यू आरूष. लै आनंदी रहा. जे करायचं ठरवशील ते मनापास्नं- जीव लावून कर. निरोगी, सुदृढ आणि समृद्ध आयुष्य जग. हॅप्पी बड्डे!!’ किरण माने यांची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.