‘वर्चस्ववादावर लाथ घालून शोषितांच्या…’; महापरिनिर्वाण दिनानिमित्त किरण मानेंची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने हे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा असलेल्या किरण मानेंनी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आणि त्यांनी स्वतःची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर ठेवली. ज्यामुळे दिवसागणिक त्यांचा चाहता वर्ग वाढत चालला आहे. किरण माने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसतात. अशातच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण मानेंनी महामानवास अभिवादन करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनध्ये लिहिलंय कि, ‘याच्यापेक्षा देखणा ”हिरो” मी आयुष्यात पाहिलेला नाही भावांनो… नादखुळा ॲटिट्युड. हजारो वर्ष चालत आलेल्या वर्चस्ववादावर लाथ घालून शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करनारा हा खरा योद्धा!’

पुढे लिहिलंय, ‘जात, धर्म, वंश, पंथ, रूढी, परंपरा, रंग, भाषा, वेश, अन्न, इतिहास, भुगोल, हवामान, तापमान सगळ्या- सगळ्या बाबतीत प्रचंड वैविध्य असलेल्या या विशाल भूभागाला एक अखंड ”देश” म्हणून एकत्र बांधणारा… प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य- समता- बंधुता- न्याय ही मुल्यं देऊन स्वत:चा विकास करण्याचा अधिकार देणारं संविधान लिहीणारा खराखुरा महानायक! डाॅ. बाबासाहेब आंबेडकर… विनम्र अभिवादन. जय भीम’. किरण मानेंची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये ‘जय भीम!!’ असे लिहिताना दिसत आहेत.