‘तू परत आल्याने..’; ‘नवा गडी नवं राज्य’मधील रमासाठी वर्षाने शेअर केली खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही घराघरात लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. मालिकेतील रमा, आनंदी, राघव या त्रिकुटाने तर प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली आहे. या मालिकेत पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या भूमिकांना कायम प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते. दरम्यान रमाच्या म्हणजेच अनिता दातेच्या वाढदिवसानिमित्त वर्षाने म्हणजेच कीर्ती पेंढारकरने एक खास पोस्ट केली आहे. जी व्हायरल होत आहे.

अभिनेत्री कीर्ती पेंढारकर हिने अधिकृत सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर करताना लिहिले कि, ‘Happy Birthday अनिता, काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती कि ‘’ती परत आलीये, आता मज्जा येणार’’. तू परत आल्याने सिरीयल मध्ये तर मज्जा येतेच आहे पण तुझ्या बरोबर असल्याने, आम्हाला खूप मज्जा येतेय…तुझा sense of humour कमाल आहे. तुझं कामावरचं असलेले प्रेम आणि त्यासाठी घ्यावे लागणारे निर्णय सुद्धा तू अगदी विचारपूर्वक घेतेस. कायम अशीच राहा आणि दुसऱ्यांना हसवत राहा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत, God bless u’.

या पोस्टमध्ये कीर्तीने अनितासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय या पोस्टवर कमेंट करत प्रेक्षकही अनिताने मालिकेत पुनरागमन केल्याने आनंद झाल्याचे सांगत आहेत. तसेच याच पोस्टवर अनेक चाहते अनिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान अनिता दातेबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती ‘वाळवी’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली होती. यानंतर आता तिचे चाहते तिला आणखी वेगळ्या कलाकृतीत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.