अभिनेता श्रेयस तळपदे घरगुती बाप्पाचे विसर्जन करत नाही; ‘हे’ आहे कारण.. जाणून घ्या


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवानिमित्त अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटी मंडळी आणि नेते मंडळींचा देखील समावेश आहे. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले हाये. ज्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून पहायला मिळत आहे. मराठी तसेच बिवलीवूड विश्वात नावलौकिक मिळवलेला अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरीसुद्धा दरवर्षी बाप्पाचे आगमन होते. पण श्रेयसच्या बाप्पाचे विसर्जन होत नाही. होय. तुम्ही बरोबर वाचलात. चला तर जाणून घेऊया यामागील कारण..

मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर भक्कम स्थान निर्माण केलेला अभिनेता श्रेयस तळपदे हा कायम चर्चेत असतो. पण सध्या श्रेयस एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयसने त्याच्या घरी विराजमान होणारा बाप्पा विसर्जित का होत नाही त्यामागील कारण सांगितले आहे. यावेळी श्रेयस म्हणाला, ‘मी नवीन घर घेतलं तेव्हाच ठरवलं की घरी बाप्पाची स्थापना करायची. आम्ही सलग सात वर्ष दीड दिवासांचे बाप्पा घरी आणले. मधल्या काळात माझे बाबा वारले तेव्हा मी फार चिडलो होतो. ज्या पद्धतीने सगळं झालं ते माझ्यासाठी धक्कादायक होतं. त्यामुळे मी चिडून घरी सांगितल यापुढे घरी गणपती बसवायचा नाही. मी चिडलो आणि आता थांबायचं असं ठरवलं’.

‘मधल्या काळात मला मुलगी झाली आणि तिने बाप्पाला घरी आणण्याची मागणी केली. तिच्या म्हणण्यानुसार आम्ही मागच्या वर्षीपासून पुन्हा गणपती बसवायला सुरुवात केली. मुलगी झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बाप्पा आणला. आमच्या बाप्पाच विसर्जन करण्याच्या आधी मुलीने शेजाऱ्यांच्या बाप्पाचं विसर्जन पाहिलं. आम्ही इकडे बाप्पाच विसर्जन करण्यासाठी हौद तयार केला होता. पण तिने आपल्या बाप्पाचं विसर्जन करायच नाही असा हट्ट धरला. आम्ही तिला समजावलं पण तिने एवढा गोंधळ घातला की शेवटी आम्ही ठरवलं की गणपती बाप्पाचं विसर्जन नाही करायचं. विसर्जनादिवशी गणपती बाप्पाच्या पायाला माती लावून त्या मातीचं विसर्जन केलं जातं आणि मूर्ती घरीच ठेवली जाते. त्या मूर्तीची दरवर्षी रंगरंगोटी करून पूजा केली जाते’, अशी माहिती यावेळी श्रेयसने दिली.