TRP’च्या शर्यतीत ‘या’ मालिकेची बाजी; जाणून घ्या कोण अव्वल आणि कोणाचा आलाय शेवटचा नंबर..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे मालिका. या मालिका रोज नवनवीन ट्विस्टसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात आणि रोजच्या शेडयूमधून थोडा विसावा देत असतात. त्यामुळे मालिकेचं कथानक, कलाकार आणि त्यातील ट्विस्ट हे कायम प्रेक्षकांना हवेहवेसे असतात. हि पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातात. दरम्यान प्रेक्षकांच्या पसंतीवर मालिकांचा दर्जा अर्थात टीआरपी समजत असतो. तर यावेळी सगळ्या मालिकांना पछाडून ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने टीआरपीच्या रेसमध्ये पहिला नंबर मिळवला आहे.

मागील आठवड्याची ऑनलाइन टीआरपीची यादी नुकतीच समोर आली असून यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका टॉप १० मध्ये नंबर वन ठरली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेली हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून या मालिकेतील मुक्ता, सागर, सई यांच्यासह गोखले आणि कोळी कुटुंब प्रेक्षकांचे लाडके ठरले आहेत. आता मुक्ता- सागरची जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक ठरली असून त्यांची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आली आहे. यानुसार ऑनलाइन टीआरपीच्या यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने लोकप्रिय ‘ठरलं तर मग’ मालिकेला मागे टाकल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ऑनलाईन टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर असून दोन ते दहा स्थानावर कोणकोणत्या मालिका आहेत..? हे जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

१) प्रेमाची गोष्ट
२) ठरलं तर मग
३) आई कुठे काय करते
४) सुख म्हणजे नक्की काय असतं
५) लक्ष्मीच्या पाऊलांनी
६) मन धागा धागा जोडते नवा
७) तुझेच मी गीत गात आहे
८) तुला शिकविन चांगलाच धडा
९) शुभविवाह
१०) मुरांबा

अशाप्रकारे ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने फार कमी काळात मोठे यश संपादन केले आहे. आता येत्या काळात हि मालिका आपले अव्वल स्थान टिकवू शकेल का..? हे पाहणे रंजक ठरणार आहे.