‘लहान मुलांची आणि गणूची मैत्री काही औरच..’; क्रांती रेडकरने शेअर केला लेकींचा गोड व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रांती रेडकर हे नाव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रांती तिच्या अभिनयाइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. क्रांतीने २०१७ साली सरकारी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केलं. त्यांना २ मुली आहेत. हे जोडपं कायम वेगवेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. दरम्यान क्रांती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे ती मुलींचे क्युट व्हिडीओ आवर्जून शेअर करते. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिने एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.

क्रांतीला झिया आणि झायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत. ती कायम आपल्या मुलींचे क्युट व्हिडीओ शेअर करताना दिसते. अनेकदा ती आपल्या मुलींना गोष्टी, किस्से आणि संस्कृतीचे धडे देताना दिसते. ती आपल्या मुलींना छबिल आणि गोदो अशी हाक मारते. क्रांतीच्या गणपती बाप्पा बसत नाही. पण तिच्या लेकींना मात्र बाप्पाची ओढ आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सुरुवातीला छबिल आणि गोदो ‘हॅप्पी बर्थडे…’ हे गाणं बोलून बाप्पाला शुभेच्छा देताना दिसतात. त्यानंतर ‘जय देव जय देव जय मंगलमूर्ती…’ आरती गाऊन बाप्पाची मनोभावे पूजा करताना दिसतात.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये क्रांतीने लिहिलं आहे कि, ‘आमच्या घरी गणपती बसत नाही पण, लहान मुलांची आणि गणूची मैत्री काही औरच असते. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या शूट दरम्यान ही बाप्पाची मूर्ती मला नेहा पाटीलने भेट म्हणून दिली होती. आता हा बाप्पा आमच्या छबिल गोदोचा खास मित्र झाला आहे. त्या दोघींच्या आयुष्यातील तो एक अविभाज्य घटक आहे. गणपती बाप्पा मोरया!! तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!’. क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.