धडके जिया..!! ‘ताली’ सीरिजच्या माहपूर्तीनिमित्त कृतिका देवने सादर केले मनमोहक नृत्य


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ हि वेब सीरिज १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाली. या वेब सीरिजच्या माध्यमातून तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या संघर्षमयी जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अजूनही या सिरींजची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान या सिरींजमधून बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने गौरी सावंत यांची भूमिका निभावली. तर त्यांच्या लहानपणीच्या भूमिकेत अभिनेत्री कृतिका देव दिसली.

नुकताच बहुचर्चित ‘ताली’ सीरिजला प्रदर्शित होऊन महिना पूर्ण झाला आहे. याचे औचित्य साधत या सीरिजमध्ये छोट्या गौरी सावंत म्हणजेच गणेशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कृतिका देवने एक अप्रतिम नृत्य सादर केले आहे. ‘ताली’ या सीरिजमधील ‘धडके जिया’ या गाण्यावर कृतिकाने कथ्थक नृत्य सादर केले आहे. कृतिका देव ही ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखची पत्नी असून एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. कृतिकाने गणेशची भूमिका उत्तम निभावली आहे आणि यामुळेच तिचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

दरम्यान सीरिजला प्रदर्शित होऊन महिना पूर्ण झाल्यानिमित्तानं तिने हे सुंदरनृत्य सादर केले. या नृत्याचा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ”’ताली’’ला एक महिना पूर्ण झाला आहे. खूप दिवसांपासून मनात होतं की, ‘‘ताली’’ मधल्या या गाण्यावर काहीतरी करावं. ते इथं सादर केलं आहे’. कृतिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी तिच्या अभिनयाइतकेच तिच्या नृत्याचेदेखील कौतुक करताना दिसत आहेत.