‘डोक्यावर घेऊन वरात काढायला…’; शाहरुखचा ‘जवान’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता होती. यानंतर आता जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हा प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाविषयी केवळ प्रेक्षक नव्हे तर कलाकार मंडळी देखील प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना ‘धर्मवीर’ फेम अभिनेता क्षितीश दातेने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता क्षितीश दाते सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. त्यामुळे तो कायम सोशल मीडियाला काही ना काही पोस्ट शेअर करतो. आता नुकतीच त्याने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने ‘जवान’ चित्रपट पाहिल्याचे सांगितले आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत त्याने लिहिलंय, ‘जवान बघितला. डिओपी, एडिटर आणि एकूणच टेक्निकल आर्टिस्ट टीमला डोक्यावर घेऊन वरात काढायला हवी. फारच सुंदर. बाकी मौज’.

शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातील त्यांचा अंदाज आणि लूक दोन्ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत. अनेक मराठी कलाकार शाहरुखच्या स्टाईलचे दिवाने आहेत आणि हे ‘जवान’च्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आले आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या कॅमिओ भूमिकेत पाहायला मिळत आहे.