‘जिवाहून प्यारा.. तूच मला यारा..’; कुशल बद्रिकेची खास दोस्तासाठी खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक विजू माने यांनी सिनेसृष्टीला ‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यासारखे बरेच एकापेक्षा एक भारी चित्रपट दिले आहेत. शिवाय मराठी सिनेविश्वातील बरेच कालक्रम त्यांचे खास दोस्त आहेत. त्यापैकी एक म्हणजे कॉमिक अभिनेता कुशल बद्रिके. विजू माने आणि कुशल बद्रिके यांनी एकत्र ‘स्ट्रगलर साला’ सारखी सिरीज प्रेक्षकांना दिली आहे. दोघांची यारी, दोस्ती तर सर्वश्रुत आहे. अशातच विजू माने यांचा २६ जुलै रोजी वाढदिवस होता आणि याचे खास औचित्य साधत कुशल बद्रिकेने अत्यंत स्पेशल अशी पोस्ट शेअर केली आहे.

कुशलने मित्रांच्या पडत्या काळात विजू माने त्यांना कशी मदत करायचे याचा उलगडा करत ही पोस्ट शेअर केली आहे. शिवाय कुशलने आपल्या दोस्तावर असलेले प्रेम अगदी निखळपणे व्यक्त केले आहे. कुशलने व्हिडिओतून त्याचे विजू मानेंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. कुशलने लिहिलंय, ‘रम्मीच्या डावात १३ पानातली ३ पानं jockers आणि 6 इतर असा विश्वविक्रम करुन स्वतःलाच आश्चर्यात पडणारे, मित्रांनी अडचणीच्या वेळी घेतलेले हजारो रुपये बुडवले तरीही मैत्रीत काही न बोलणारे पण कधीतरी गम्मत म्हणून पत्ते खेळताना चुकून 150/200 रुपये जिंकलेच तर ते मात्र बुडता कामा नये असे तत्वनिष्ठ, Struggler sala ह्या आमच्या webseries साठी आमच्या dates एकत्र मिळाव्या ह्या साठी गेली अनेक वर्ष struggle करणारे’.

पुढे लिहिलं, ‘लेखक, दिग्दर्शक , निर्माता या पलीकडे जाऊन “जेवणात ताक आणि मनात कायम बायकोचा धाक” अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे. आणि sunday family साठी राखून ठेवणारे. विजू दादा तुम्हाला happy birthday’. दरम्यान, कुशलच्या या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने एक खास कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘तुझी post वाचून आठवलं मी मानेचे ७० रुपये द्यायचे बाकी आहे. तरीच तो सतत call करतोय मला’. याशिवाय अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत विजू माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.