‘तुझ्यासारख्या माणसांना वय नसतं..’; कुशल बद्रिकेने लिहिली संजय जाधवांसाठी खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत अविरत काम करत एकापेक्षा एक सरस कलाकृती देणारे दिग्दर्शक संजय जाधव यांचा १८ जुलै रोजी वाढदिवस झाला. यानिमित्त सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये अभिनेता कुशल बद्रिकेचा देखील समावेश आहे. तर कुशलने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर संजय जाधव यांच्यासोबतचा एक कमाल फोटो शेअर केला आहे. ज्या सोबत त्याने लिहिलेले कॅप्शन प्रचंड चर्चेत आहे.

कुशलने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘तशी आपली ओळख फार जुनी म्हणजे “साडे माडे तीन” पासूनची पण मैत्री कधीपासूनची? हे काही मला नीटसं सांगता येणार नाही. “गंगुबाई नॉन मॅट्रिक” फिल्मच्या सेटवर फ्रेम रिकामी दिसते! म्हणून मला वापरलंस तिथली, का मग “रावरंभाच्या” हॉटेलमधली पहाटेच्या 5:30ची ब्लॅककॉफी वाली मैत्री आपली, का मग “हवा येऊ द्या”च्या सेटवर मी संजू दादा बनून येतो आणि तुझ्यासारखा “सारे विश्वची माझे घर” असल्यासारखा वावरतो तेव्हाची, का मग आत्ता आत्ता लंडनच्या बसमध्ये तुझ्या Spartas सोबत झालेल्या प्रवासातली मैत्री. दादा तुला ना माणसांना आपलंसं करून घ्यायचं व्यसन आहे’.

‘एवढी “दुनियादारी” बघितलेला माणूस तू ,आयुष्याने “चेकमेट” केलं तरी “फक्त लढ म्हणणारा” असा “गुरु” तूच. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत तुझी एक “प्यार वाली लव स्टोरी” आहे आणि प्रत्येकाच्या यशात तुझा “खारी बिस्किटाचा” तरी वाटा आहेच. आज तुझ्या वाढदिवशी तुझ्या “कलावतीला” लोकांच्या मनापर्यंत जायला “डोंबिवली फास्ट” ट्रेन मिळू दे आणि box office वर “धुडघूस” घालू देत हाच देवाकडे “जोगवा” मागतो. Happy birthday दादा खूप खूप शुभेच्छा आणि तुला मनापासून प्रेम. तुझ्यासारख्या माणसांना वय नसतं हेच खरं……..’