‘हे अनोळखीपण फार जीवघेण…’; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता कुशल बद्रिके हा मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय विनोदवीर आहे. कमाल विनोदाचं टायमिंग आणि परफेक्शनमूळे कुशलने विनोद शैलीत एक विशेष ओळख निर्माण केली आहे. केवळ हसणे, हसवणे नव्हे तर लिहिणे हादेखील कुशलचा छंद आहे. गेल्या काही काळापासून तो ‘सुकून’ या नावाने लिहितोय आणि त्याने लिहिलेले विचार नेटकऱ्यांना पटताना दिसत आहेत. आताही त्याची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुशलने हि पोस्ट शेअर करताना स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिलेलं कॅप्शन फारच लक्षवेधी आहे. यात कुशलने लिहिलंय कि, ‘आयुष्य आणि आयुष्यातली माणसं… ज्यांच्या डोळ्यांमध्ये कधीतरी आपण स्वतःसाठीची हुरहूर पाहिली, आपल्यासाठी आनंदाने भरुन आलेलं आभाळ आणि दुःखाने ओलावलेल्या कडा पाहिल्या. त्यांच्याच डोळ्यात आपल्यासाठीचे अनोळखी भाव पाहिलेत का कधी..? की जणू आपण ह्या व्यक्तीला ओळखतंच नाही… हे अनोळखीपण फार जीवघेण असतं यार! आणि कधीकधी हे अनोळखीपण आपल्या स्वतःसाठी, “स्वतःच्याच” नजरेत उतरत. (सुकून)’

कुशलच्या इतर पोस्टप्रमाणे ही पोस्टदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये प्रार्थना बेहरे आणि समीरा गुजर यांचाही समावेश आहे. शिवाय एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘तू खूप छान लिहितोस.. अगदी मनाला भावतं’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘Totally relate this day’s, कधी कधी ना माणसं कशी ओळखायची हे समजायला बराच वेळ लागतो. तसं म्हणायचं झालं तर ना आपली माणसं वगळता ज्यांच्याशी आपला एक वेगळ्या प्रकारचा bond तयार होतो तोही घट्ट असतो पण कालांतराने तीही दूरावतात. मग ओळखीच्या लोकांची तर गोष्ट निराळी’.